Posts

मराठी गझल

Image
https://www.facebook.com/govind.naik.3382 मस्करीची कुस्करी होऊ नये नेमकी अफवा खरी होऊ नये लागला आहे लळा मलमा तुझा ही जखम आता बरी होऊ नये एक साधा चर दिसत आहे मला काळजी घेऊ दरी होऊ नये जन्म एका पावलातच संपला उंच इतकी पायरी होऊ नये दोन ओळींचे मरण येवो मला शेवटी कादंबरी होऊ नये गोविंद नाईक नाव किनाऱ्याकडे वळवली नाही मग लाटांची भीती उरली नाही तशीच आहे शाल कपाटामध्ये ती गेल्यावर थंडी पडली नाही रोज परीक्षा निकाल रोजच असतो कधीच इथली शाळा सुटली नाही त्या दुःखाचे दुःख कुणाला सांगू ज्या दुःखावर कविता सुचली नाही झोपडीतली भूक उपाशी निजली बंगल्यातली पंगत उठली नाही उगीच शोधत शोधत खाली आलो मला स्वतःची जागा कळली नाही झाडाला बांधून ठेवली होती  पण तुटलेली फांदी जगली नाही सताड उघडे आहे वादळ माझे मी वाऱ्याची कडी लावली नाही शब्द एकही खरेपणाचा नव्हता म्हणून त्याची गाथा तरली नाही कडा अजुनही उंच वाटला असता दरी पुरेशी खोल उतरली नाही मुक्कामाला निमित्त झाले असते पण शेवटची गाडी चुकली नाही गोविंद नाईक कधी कधी चुकतात मंदिराकडच्या वाटा  टेकवला जातो फसव्या चरणांवर माथा  फुलांमधे राहून वेगळा पडत असावा  कठोर नसतो जन्मत

मराठी गझल

Image
https://www.facebook.com/profile.php?id=100014811273394 माझ्या तिरडीच्या भोईंनो माफ करा मला लाभलेल्या सोयींनो माफ करा जगत राहिलो, तुमच्या स्वीकारून चुका बस निर्दोष ठरत दोषींनो माफ करा न्याय तुम्हाला देऊ शकलो नाही मी नशेत सुचलेल्या ओळींनो माफ करा चुकून आधी जन्माला आलो आम्ही नव्या जमान्याच्या पोरींनो, माफ करा फार लावली सवय तुम्हाला मी माझी मला लागलेल्या सवयींनो माफ करा हेतुपुरस्सर झाल्या त्यांनी मुजरा घ्या उगाच झालेल्या भेटींनो माफ करा राजा ठरलो असतो या लाचारांचा मी न चाललेल्या चालींनो, माफ करा एक देवपण हाक मला मारत आहे सवंग, लसलसत्या उर्मींनो माफ करा बरा व्हायचे होते मला स्वभावाने मी न काढलेल्या खोडींनो माफ करा -'बेफिकीर'! ती गझल- 06 जुलै 2017 ================== जी मनावरती नशा बनुनी पसरते ती गझल जी कवीपासून मदिरा दूर करते ती गझल भांडणे होतात माझी सारखी माझ्यासवे जी स्वतःबद्दल स्वतःचे कान भरते ती गझल जो तिला प्रत्येकवेळी साथ देतो तो कवी ऐनवेळी जी कवीलाही विसरते ती गझल दाद वरवरचीच घेतो आत्मप्रौढीने कुणी जी मुळापासून हृदयाला उकरते ती गझल फेकली जाते प्रवाहातून जेव्हा सारखी भोवरा शोध

मराठी गझल

Image
https://www.facebook.com/akash.kankal.12 तिने बोलायच्या आधी तिचे बोलायचे डोळे तिला सांगायचे आहे मला सांगायचे डोळे तिच्या ओठांवरी दुसऱ्या कुणाचे नाव आले तर कशाला मग तिचे मागून मी झाकायचे डोळे? कसे वागायचे डोळे , तिची ती वाट बघतांना घरी परतायचो मी पण ,तिथे थांबायचे डोळे तिला जमले न भेटाया ,मला जमले न बोलाया नजर चुकवून सर्वांची तरी भेटायचे डोळे तिचा पाऊस आला अन, मनी तरळून मग गेला तरी पण कोरडे च्या कोरडे ठेवायचे डोळे चिमुरडा खेळणी बघतो,कुण्या जत्रेमधे मोठ्या तुलाही पाहताना मग तसे हरवायचे डोळे - आकाश.

मराठी गझल

Image
कशी ठेवली कशी टिकवली दुःखावर मी दहशत माझी या दुनियेला कळेल बहुधा मी गेल्यावर किंमत माझी .. श्रीमंती कोरडी मिळवणे एव्हाना जमले असते , पण लाचारी तारण देण्याइतकीही नव्हती ऐपत माझी... जितका पैसा लाटत गेलो तितकी गरिबी वाढत गेली जितका वाटत गेलो पैसा तितकी झाली बरकत माझी केवळ हसणे बघून माझे उंबऱ्यातले दुःख परतले  बहुधा त्याला असेल रुचली ही रडण्याची पद्धत माझी... माझ्या दारिद्र्यावर माझे शत्रू कधीच नव्हते हसले पण मित्रांनी वेळोवेळी मस्त काढली इज्जत माझी... साधन हाती असूनसुद्धा हिंडत बसलो जन्म हजारो मी देहाला साध्य समजलो इथेच झाली गफलत माझी... - संतोष वाटपडे दुःख प्रेमातून माझ्या वेगळे करता न आले सोडुनी गेलीस तेव्हा मोकळे रडता न आले ... अंगणी खोट्या सुखाचा मोसमी पाऊस झाला केवढे दुर्भाग्य माझे त्यातही भिजता न आले ... स्वप्न दारी पापण्यांच्या यायचे दररोज फिरण्या मात्र डोळ्यांना बिचाऱ्या स्वप्नही बघता न आले ... राहिला संवाद नाही ..भेटणे नशिबात नाही  सत्य असुनी काळजाला मान्य ते करता न आले... युद्धभूमीवर रथाचा... सारथी श्रीकृष्ण नव्हता आप्त माझ्या वेदनेशी शेवटी लढता न आले... याच प्रश्नाने अघोरी नेहम