मराठी गझल
तिने बोलायच्या आधी तिचे बोलायचे डोळे
तिला सांगायचे आहे मला सांगायचे डोळे
तिच्या ओठांवरी दुसऱ्या कुणाचे नाव आले तर
कशाला मग तिचे मागून मी झाकायचे डोळे?
कसे वागायचे डोळे , तिची ती वाट बघतांना
घरी परतायचो मी पण ,तिथे थांबायचे डोळे
तिला जमले न भेटाया ,मला जमले न बोलाया
नजर चुकवून सर्वांची तरी भेटायचे डोळे
तिचा पाऊस आला अन, मनी तरळून मग गेला
तरी पण कोरडे च्या कोरडे ठेवायचे डोळे
चिमुरडा खेळणी बघतो,कुण्या जत्रेमधे मोठ्या
तुलाही पाहताना मग तसे हरवायचे डोळे
- आकाश.

Comments
Post a Comment